Award

पुरस्कारः गावाला २००३ साली ‘विमाग्रामचा’ पुरस्कार मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान गावात उत्कृष्टप्रकारे राबविले आहे. नागरिकांची आपआपसांतील भांडणे समझोत्याने मिटविण्यात आली. त्यामुळे पोलिस स्टेशनकडे जाणारया नागरिकांची संख्या अत्यंत कमी झाली. परिणामी गावात शांतता निर्माण झाली. आंबेगाव तालुक्यात चांगले अभियान राबविल्याबद्दल गाव बक्षिसास पात्र झाले. ‘एक गाव एक गणपती’ स्पर्धेत गावाने हिरहिरीने भाग घेतला.गावात सुरुवातीला सहा ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवला जात असे. त्यातून चुरस निर्माण होऊन युवकांमध्ये भांडणे होत असत. त्यामुळे ‘एक गाव एक गणपती’ स्पर्धेत भाग घेऊन गावात एकच गणपती बसविण्यात आला. त्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवात चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ स्पर्धेत गावाला २००३ साली पारितोषिक मिळाले. गावात उत्कृष्ट प्रकारची स्मशानभूमी बांधली आहे. या स्मशानभूमीत विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत. नागरिकांना बसण्यासाठी उत्तम दर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्मशानभूमी अन्य गावांसाठी ‘रोल मॉडेल’ बनली आहे.