God of Village

ग्रामदैवतः काळभैरवनाथ! महाभारत कालखंडात पांडव विश्रांतीसाठी काही काळ येथे थांबले. त्यावेळी त्यांनी काळभैरवनाथ या दैवताची प्राणप्रतिष्ठा केली. भैरवनाथाचे हे देवस्थान जागृत म्हणून प्रसिध्द आहे. काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ येथे येत असतात. नवसाला पावणारा देव अशी याची ख्याती आहे. गुळशेरणी, हारफुले, घंटा वाहून, भैरवनाथाला त्रिशूल अर्पण करुन नवसाची पूर्तता करतात. या ग्रामदैवताच्या मंदिराचा ग्रामस्थांनी नुकताच जीर्णोध्दार केला आहे. अत्यंत प्रशस्त आणि सुंदर उत्तरमुखी मंदिर बांधले आहे. चैत्र शुध्द पंचमीला ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा भरते.