Spiritual Places

धार्मिक स्थळः हुसेनबाबांचे मंदिर हे हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असून गावचे धार्मीक वैशिष्ठ्य आहे. हुसेनबाबा हे मुसलमान परंतु त्यांच्या पीराला येथील लोक मंदिर म्हणतात. यावरुनच हिंदू – मुस्लिम बांधवात आपलेपणा दिसून येतो. त्यामुळे गावात हिंदू – मुस्लिमांमध्ये जातीय तणाव- दंगली होत नाहीत. हुसेनबाबांचे मंदिर बांधण्यात हिंगे – पाटील कुटुंबियांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. हुसेनबाबांची सेवा हिंदू लोक मोठ्या भक्तीभावाने करतात. मुस्लिम बांधवांचे मंदिर हिंदू लोक बांधतात आणि त्याची सेवाभक्तीभावाने करतात, असे उदाहरण दुसरीकडे सापडणे दुर्मीळच! यामुळेच गावात सलोख्याचे वातावरण आहे. गावात श्री हनुमान मंदिर आणि मुस्लिम बांधवांची मशिद शेजारी आहे. मात्र, कधीही जातीपातीच्या कारणावरुन दंगल झाली नाही. 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर,
कुलस्वामी खंडेराय मंदिर,
शंकर भगवान मंदिर,
नागेश्वर मंदिर,
आदिशक्ती मुक्ताई मंदिर,
तुळज भवानी मातेचे मंदिर,
गणपती,
मांगीरबाबा मंदिर आहे.
ही सर्व मंदिरे
अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत.