Fact & Figure

Govt Statistical Info

शासकीय संख्यिकीः अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीची स्थापना १५ जानेवारी १९३५ रोजी झाली
गावाची लोकसंख्याः ४ ह्जार ३९४
ग्रामपंचायत सदस्य संख्याः ११
मतदारः ३ ह्जार २२०
मागासवर्गीयांची संख्याः ४६२
उर्वरित मराठा समाजः
                     ३ हजार ९३२
तालुक्याचे ठिकाणः                         घोडेगाव
घोडेगाव ते अवसरी बु.अंतरः             ९ कि.मी.
श्रीक्षेत्र भीमाशंकर ते अवसरी बु.अंतरः ७० कि.मी.
जमिनीबद्दल माहितीः गावात बागायती आणि जिरायत दोन्ही प्रकारची जमीन आहे. गावच्या नदीकडच्या भागात सुपीक, काळी कसदार जमीन आहे. तर, गावच्या दक्षिण बाजूस काही प्रमाणात हलक्या प्रतिची जमीन पहावयास मिळते.
गावात एकूण जमिनः
१ हजार ०७४ हेक्टर क्षेत्र
लागवडीखालील जमीनः १ हजार २१२ हेक्टर क्षेत्र
पडीक जमीनः ४९२ हेक्टर
गायरान जमीनः ३० हेक्टर
गावठान जमीनः १५ हेक्टर
नद्या नालेः ५५ हेक्टर

Income Source

उत्पन्नाची साधनेः गावात मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे. पारंपारिक पिकाबरोबर ऊस यासारखी पिके घेतली जातात. फळबागांवरही शेतकरी भर देत आहे. त्यातून  मिळणारया उत्पन्नावर शेतकरी उपजीविका करीत आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतीवर आधारित असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. दर पंधरवड्याला दुधाचे पगार होत असल्यामुळे शेतकरी या व्यवसायावर भर देत आहेत.  अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण कुक्कुट पालनाचा व्यवसाय करीत आहेत.गावात पाच मोठ्या पोल्ट्री आहेत. नाविन्याची कास धरणारे लोक असल्यामुळे गावात दोन ठिकाणी रेशीम उद्योग सुरु आहे. गावात नऊ हॉटेल्स्, एक धाबा आणि १० किराणा मालाची दुकाने आहेत. गांडूळखत प्रकल्पही गावात आहे. 

Different Yojna

विविध योजनाः राज्य सरकारच्या यशवंत ग्राम संमृध्दी योजनेअंतर्गत गावात शॉपिंग कॉंप्लेक्स बांधण्यात आले आहे. याच योजनेअंतर्गत दोन एकर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. परिसरात झाडे लावण्यात आली आहेत. सर्वत्र फरशी असून आंघोळीसाठी स्वतंत्र बाथरुमची व्यवस्था केली आहे. अत्यंत सुंदर आणि नियोजनपूर्वक बांधलेल्या स्मशानभूमीमुळे गावच्या शोभेस अधिक भर पडली आहे. भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची कमतरता पडू नये यासाठी ‘महाजल’ योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.