Employment Availibility

Agricultural

शेतीः गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीला प्रामुख्याने पाणी घोडनदीवर केलेल्या लिफ्ट एरिकेशनच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे नदीकडील भाग समृध्द आणि डोंगराकडील भाग पाण्यावर अवलंबून अशी परिस्थिती होती. परंतु डिंबे धरणाचे पाणी काढण्याच्या माध्यमातून शेतीला मिळू लागले. त्यामुळे एकीकडे समृध्दी आणी दुसरीकडे दुष्काळ ही परिस्थिती लोप पावली आहे. आज गाव हिरवेगार आणी धनधान्याने समृध्द आहे. शेतीत बाजरी, ज्वारी, बटाटे, कांदे, ऊस, पालेभाज्या ही प्रमुख पिके घेतली जातात. दुग्ध व्यवसाय , कुक्कुट पालन व्यवसाय तरुण प्रामुख्याने करीत आहेत. शेतीमाल पुणे-मुंबई, दिल्ली यासारख्या शहरांत पाठवण्यासाठी हुंडेकरी हा व्यवसाय केला जात आहे. त्यातूनही रोजगार उपलब्ध झाला आहे.

Self Employment

स्वयंरोजगारः गावातील सत्यजित हिंगे या सुशिक्षित तरुणाने चिक्की तयार करुन विक्रीचा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पातून शेंगदाणा, राजगिरा चिक्की तयार होते. पुणे जिल्ह्यात या चिक्कीची विक्री होते. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेवई आणी मसाला, मिरची कांडप, कडधान्य व्यवसाय महिला अतिशय उत्तम पध्द्तीने करीत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून शेवई, मसाला, डाळविक्री यांसारखे छोटे व्यवसाय सुरु आहेत. मेणबत्ती, खडू तयार करणे, खाद्य पदार्थ तयार करणे यासारखे व्यवसाय अनेकजण करत आहेत. गावातील अनेक तरुणांनी जीप टेंपो घेऊन स्वतः रोजगार उपलब्ध केला आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालनामधून मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार  उपलब्ध झाला आहे. समविचारी तरुणांनी एकत्र येऊन गावात यशोदीप मंगल कार्यालय सुरु केले आहे. त्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात.

Gramodyog

Udyog

उद्योगः गावात चप्पल करण्याचा छोटा कारखाना आहे. अनेक नागरिक येथील चप्पल टिकाऊ असल्यामुळे आवर्जून वापरतात. पुणे, मुंबई, ठाणे येथील नागरिकांकडून  मागणी जास्त आहे. फॅब्रिकेशनचे दोन प्रकल्प असून त्यात विविध प्रकारची कामे केली जातात. गावात ट्रांस्पोर्टचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे.