Infrastructure Availability

समस्याः
गावातील काही भागात भूमिगत गटारे नाहीत. वस्त्यांना जोडणारे रस्त्यांचे डांबरीकरण केलेले नाही. गावात रुग्णवाहिका, क्रीडांगण यांचा अभाव आहे. गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग, बगीचा नाही.

आरोग्य सुविधाः

गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची उभारणी १९६१ साली झाली. या उपकेंद्रामार्फत हिवताप, माताबाल संगोपन, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मुलन, अंधत्व निवारण, कुटुंब नियोजन यासारखे कार्यक्रम राबविले जातात. प्रथमोपचाराबरोबरच महिलांची डिलेव्हरी केली जाते. शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार आणि सल्ला दिला जातो. जन्म, मृत्यू, बालमृत्यू नोंदणी केली जाते. घरोघरी भेट देऊन साथीच्या रोगांचे सर्वेक्षण केले जाते. पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. पल्स पोलिओ, जंतनाशक, आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाते. गावात आरोग्यदिन साजरा केला जातो. गावात सहा खासगी दवाखाने आहेत. त्यात विविध प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. गावात तीन औषधांची दुकाने आहेत.

 शौक्षणिक सुविधाः

अवसरी बु.।। च्या वेशीतून आत प्रवेश केल्यानतर उत्तरेला विघा विकास मदिर उच्च माध्यमिक विघालय आणि दक्षिणेला पुणे जिल्हा परिषदेचे नेताजी सुभाष विद्यालयाची भव्य दिव्य इमारत आहे. नेताजी सुभाष विद्यालय ही पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी शाळा आहे.शाळेची इमारत जुन्या पध्दतीची कौलारु असली तरी प्रशस्त आणि सुस्थितीत आहे. नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. शाळेच्या चारही बाजूंनी भिंतीचे कंपाऊंड आहे. शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांना खेळाची आवड व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात खेळाचे मैदान आहे. चौथीच्या स्कॉलरशिप परिक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेण्यासाठी शिक्षक अथक परिश्रम घेत असतात. त्यामुळेच या शाळेचे विद्यार्थी स्कॉलरशिप परिक्षेत जिल्ह्यात चमकलेले असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा पाया मजबूत करण्याचे काम ही शाळा अविरतपणे करत आहे. इयत्त चौथीनंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने गावातील बुजूर्ग मंडळींनी एकत्र येउन शिक्षण प्रसारक मंडळी अवसरी बुद्रुक या संस्थेमार्फत विद्या विकास मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. शाळेची इमारत कौलारु आहे. शाळेच्या पाठीमागे तळे आणि हिरवीगार झाडे आहेत. इमारतीपुढे आकर्षक रेखीव पध्द्तीने झाडे लावली आहेत. त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे.

सुरुवातीला इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. मार्च १९८९ ला शाळेचा दहवीचा निकाल अवघा ३३.३३% निकाल लागला. त्यानंतर तत्कालीन मुख्याध्यापक एस्. के. गवळी आणि पर्यवेक्षक श्याम कसाब सर यांनी शिक्षकांना बरोबर घेऊन चर्चा केली. दहावीच्या विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता शाळेत बोलाविण्यात सुरुवात झाली. विद्यार्थी सकाळी ७ ते १० यावेळेत अभ्यास करतात. त्याचप्रमाणे गणित, भूमिती, विज्ञान, इंग्रजीचे जादा तास घेतले जातात. सर्वच विद्यार्थी एका बुध्दीमत्तेचे नसल्यामुळे बुध्दीमत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या तुकड्या करण्यात आल्या. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकविल्यामुळे विद्यालयाच्या निकालाचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर सातत्याने या विद्यालयाचा निकाल ९९ ते १०० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत मार्च १९९१ मध्ये एक तर १९९५ मध्ये तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामुळे विद्यालयाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. दहावीच्या परीक्षेत विद्यालयाने कमाविलेल्या यशाचा ‘अवसरी पॅटर्न’ या नावाने गौरव होऊ लागला. या विद्यालयाची यशस्वी घोडदौड आजही सुरु आहे. इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेचे शिक्षण देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली. आयटी आणि बीटीच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी भविष्याची गरज ओळखून गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आहे. गावातील वाड्यावस्त्यांवर एकूण सहा अंगणवाड्या असून त्यांचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी यशाचे उत्तुंग शिखर पादाक्रांत करण्यासाठी लागणारी ईर्षा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती नेताजी सुभाष विद्यालय आणि विद्या विकास मंदिर या दोन्ही शाळांनी दिली. याच शाळेने हसरं बनवलं, स्वप्नाळू वृत्तीची जोपासना केली. त्याचबरोबर बोचरी शिस्त लावली. पण त्या शिस्तित आपुलकीचा ओलावा आहे. शालेय जीवनात कटुता.. राग … आहे. पण त्यापेक्षा अधिक ह्ळुवार स्नेह, प्रेम आणि गोजरी माया आहे.
सुरवंटाचे झाले पाखरु, सर्वत्र लागले भरारया मारु,
नवे जग, नवी आशा, शोध घेण्याची जबर मनिषा
याच शाळेने लावलेले वळण, त्यावर चढू यशाची जडण!

असे गुणगुणत अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, प्राचार्य, शिक्षक, पत्रकार, वकील, राजकारणी, सैनिक, शासकीय अधिकारी, तहसिलदार, उपजिल्हाधिकारी, उद्योजक, चांगले शेतकरी तयार झाले आहेत.

सुविधा
पायाभूत सुविधाः गावातल्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गाव आणि वस्त्यांना जोडण्यासाठी खडी आणि मुरम्याचे रस्ते तयार केले आहेत. खालचा शिवार, भोकरशेत, चव्हाण मला, गुणगे शेटेनला, हिंगेमला, घुली, कालंबा येथे जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर वीजेच्या दिव्याची सोय केली आहे.

नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने घोडनदीवरूण पाणीपुरवठा योजना केली आहे. दीड कि.मी. वरूण गावाला पिण्याचे पाणप आणले आहे. हे पाणी उंचावरील टाकीत साठविण्यात येते. त्यांतर गावाला योग्य दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा होतो. या योजनेची 10 हजार लोकसंख्येला पाणीपुरठवा करण्याची क्षमता आहे.

गावची पाणीपुरठवा योजना आबेगाव तालुक्यातील सर्वात चांगली योजना ठरली आहे. गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. गावात एसटी, खासगी जीप आणि सिक्स सिटर या दलणवलणाच्या सोयी आहेत. गावातील नागरिक मोठ्या संख्येन मुंबई येथे राहात आहेत. त्यामुले रोज सकाली अवसरी बु.।। ते कल्याण एसटी जाते. त्याचप्रमाणे त्यांतर दुपाही पुन्हा ही एसटी कल्याणवरूण सुटून रात्री गावात मुक्कामाला येते. पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा गावात आहे. पोस्टकार्यालय, दूरध्वनीचे केंद्र गावात असल्यामुले वाडीवस्तीवरही फोनची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आठवङे बाजारः

गावातील आठङयाचा बाजार शनिवारी भरतो. बाजारासाठी ओटे बाधण्यात आले आहेत. गावातील व्यापारी लोकाबरोबर बाहेरगावचे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी बाजारात येतात. बाजार हा सकाळपासून दुपारपर्यत असतो. बाजारात फळे, पालेभाज्या, कादा, बटाटा, कपङे, घरगुती वापरासाठी लागणारी भाङी, कङधान्य, धान्य आदीचा समावेश असतो. खरेदी करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी असते. अवसरीतील आठवङे बाजार आजही पचक्रोशीत प्रसिद्र आहे.