Asawari

माझे गाव (About My Village) अवसरी बुद्रुक

नावाविषयी माहितीः

महाभारतातील कालखंडामध्ये पांडव वनवासात असताना विश्रांतीसाठी आमच्या गावी थांबल्यामुळे ‘अवसर’ (थकवा घालविण्याचे ठिकाण) हे नाव पडले. त्यानंतर हिंदवी

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभाराच्या निमित्ताने प्रवास करीत असताना पूर्व इतिहासानुसार पांडवकालीन परंपरेचा वारसा जपण्याकरीता ‘अवसर’ घेण्यासाठी आमच्या गावी थांबत. ‘अवसर’ आणि शेतसारा जास्ती असल्यामुळे बुजुर्ग (थोरले) या दोन्ही शब्दांचा अपभ्रंश होऊन ‘अवसरी बुद्रुक’असे नामकरण झाले. गावात पांडवकालीन विहिरी आहे. डोंगरावर प्रभू रामचंद्र यांच्या धर्मपत्नी सीतामाई यांच्या न्हाणीचे काही अवशेष उपलब्ध आहे अशी कथा सांगीतली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात यवनांच्या बेबंदशाहीपासून रयतेचे राज्य निर्माण करुन संरक्षणासाठी चाकण या भुईकोट किल्यापासून शिवनेरी या ठिकाणी जाणारा भुयारी मार्ग अवसरी बुद्रुक या गावातून जात आहे. त्या मार्गाचे अवशेष आजही पहावयास मिळतात.